एसपी ऑफिसनजीक घडली घटना : ॲडव्होकेट गंभीर
प्रतिनिधी / बेळगाव
चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारची जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात ॲड. आर. टी. पाटील जखमी झाले असून त्यांना अधिक उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गुरूवारी एसपी ऑफिसनजीक ही घटना घडली. ॲड. आर. टी. पाटील दुचाकीवरून जात असताना समोरून येणाऱया कारच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने चुकीच्या दिशेला आलेल्या कारची त्यांच्या दुचाकीला धडक बसली अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. या अपघातानंतर कारचे टायरही बस्ट झाले.