चालू महिन्याच्या प्रारंभी श्रद्धा कपूरने ‘चालबाज इन लंडन’ या आगामी चित्रपटाची घोषणा केली होती. 1987 मध्ये श्रीदेवी यांच्या ‘चालबाज’ या चित्रपटाचे दिग्दर्शक पंकज पराशर हेच याचे दिग्दर्शन करणार आहेत. श्रद्धा कपूर यात दुहेरी भूमिकेत आहेत. चित्रपटासाठी श्रद्धा ऍक्शनचे प्रशिक्षण घेणार ओ. तसेच विदेशी भाषांचे धडे गिरविणार आहे. चित्रपटाच्या पटकथेचे काम सुरू आहे. पंकज पराशर यांच्यासह ‘बागी 2’चे पटकथालेखक जोजो खान आणि ‘ड्रीमगर्ल’चे पटकथालेखक निकेत पांडे यांना याची जबाबदारी देण्यात आली आहे. पटकथा अंतिम होताच चित्रपटाच्या चित्रिकरणाच्या तारखा निश्चित केल्या जाणार आहेत.
Previous Articleपीडितेला 20 आठवडय़ांनंतरही गर्भपाताची परवानगी
Next Article नकारात्मक प्रतिमेमुळे झाले होते दुःखी
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.