पहिल्या दोन्ही टप्प्यातील चाचण्या यशस्वी : सरकारकडून परवानगी मिळताच लसीकरण मोहीम देशभर राबविणार
मॉस्को / वृत्तसंस्था
जगातील अनेक देशांमध्ये कोरोना प्रतिबंधक लस शोधण्याचे काम सुरू आहे. अनेक लसी शेवटच्या टप्प्यात आहेत. मागील महिन्यात रशियाने आपल्या स्पुटनिक-व्ही या लसीला अधिकृतरित्या मान्यता देत सर्वांना धक्का दिला होता. आता रशियात याच आठवडय़ात ही लस सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध करण्याची शक्मयता आहे. दरम्यान, रशियाच्या या लसीला गामलेया रिसर्च इन्स्टिटय़ूटने संरक्षण मंत्रालयासोबत मिळून बनवले असून, पहिल्या दोन टप्प्यातील चाचण्या यशस्वी झाल्या आहेत.
सर्वसामान्यांसाठी लस उपलब्ध करण्याची एक प्रक्रिया आहे. 10 ते 13 सप्टेंबरपर्यंत नागरिकांच्या उपयोगासाठी लसीच्या बॅचला परवानगी मिळेल. त्यानंतर लसीकरण सुरू होईल, असे वृत्त स्थानिक प्रसारमाध्यमांनीही दिले आहे. या आठवडय़ापासून कोरोनाची लस सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध केली जाईल, अशी माहिती रशियाच्या एका वरि÷ अधिकाऱयानेही दिली. रशियन न्यूज एजन्सीचे उपसंचालक डेनिस लोगुनोव्ह यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. स्पुटनिक व्ही लसीला रशियाच्या आरोग्य मंत्रालयाच्या परवानगीनंतर व्यापक उपयोगासाठी जारी केले जात आहे. आरोग्य मंत्रालय लसीची चाचणी सुरू करणार आहे. आम्हाला लवकरच याची परवानगी मिळेल, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.
भारतातही चाचण्यांना गती
कोरोना विषाणूची प्रकरणे जगभर वेगाने वाढत आहेत. भारतातच सक्रिय प्रकरणे झपाटय़ाने वाढून 42 लाखांच्या वर पोहोचली आहेत. वाढत्या संसर्गामुळे भारतच नाही तर संपूर्ण जग लसीची आतुरतेने वाट पाहत आहे. भारतातही स्वदेशी बनावटीच्या कोवॅक्सिनची अंतिम टप्प्यातील चाचणीही सुरू झाली असून आता या लसीचे वितरण संपूर्ण देशात व्यवस्थितपणे करण्याच्यादृष्टीने पेंद्र सरकार विशेष नियोजन करत आहे.
भारतात अद्याप लसीचे दुष्परिणाम नाहीत
भारतीय स्वदेशी कोविड-19 च्या लस कोवॅक्सिनच्या फेज-3 चाचणी सुरू झाली आहे. फेज-1 चाचणीच्या निकालांवरून या लसीचे कोणतेही दुष्परिणाम समोर आले नाहीत. सध्या, अहमदाबादमधील झाइडस कॅडिलाच्या झायकोव्ह-डी लसची टप्पा-1/2 चाचणी भारतातही चालू आहे. त्याचबरोबर ऑक्सफोर्ड-ऍस्ट्रजेनेकाच्या कोशिल्ड कोविडö19 लसच्या फेज-3 चाचणी सिरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाने सुरू केली आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च किंवा आयसीएमआरने कोविड-19 लस कमीतकमी सर्वांसाठी उपलब्ध करून देण्याची योजना तयार केली जात आहे. आयसीएमआर भारतात कोविड-19 साथीच्या आजाराशी लढा देण्यासाठी एक प्रभावी यंत्रणा तयार करत आहे. भारतात लसीला मान्यता मिळाल्यानंतरही उत्पादन, वितरण आणि मोठय़ा प्रमाणात लसीकरणासमोरील आव्हाने अजूनही कायम आहेत. या लसींचा वेळेत विकास केल्यास अधिकाधिक जीव वाचविण्यात मदत होईल, असा दावा केला जात आहे.
नऊ लसी फेज-3 टप्प्यात
रशिया आणि चीनने प्रत्येक लस वापरासाठी मंजूर केली असली तरी, डब्ल्यूएचओच्या म्हणण्यानुसार अद्याप नऊ लस तिसऱया टप्प्यातील चाचणीपर्यंत पोहोचल्या आहेत. याशिवाय फेज-1 आणि फेज-2 चाचणीमध्ये सुमारे 24 लस आहेत. यात ऑक्सफोर्ड/ऍस्ट्रजेनेका (यूके) च्या कोव्हशील्ड व्यतिरिक्त, कर्करोग जीवशास्त्र/बीजिंग इन्स्टिटय़ूट ऑफ बायोटेक्नॉलॉजी (चीन), गमालय रिसर्च इन्स्टिटय़ूट (रशिया), सिनोवेक (चीन), वुहान इन्स्टिटय़ूट ऑफ बायोलॉजिकल प्रॉडक्ट्स / सिनोफर्म (चीन), बीजिंग इन्स्टिटय़ूट ऑफ बायोलॉजिकल उत्पादने / सिनोफर्म (चीन), मोडर्ना (यूएस), बायोनोटेक/फायझर (यूएस) यांनी फेज-3 चाचण्या सुरू केल्या आहेत. जॉन्सन अँड जॉन्सनची जानसेन फार्मा ही लस फेज-3 चाचणीसाठी तयार आहे, परंतु अद्याप स्वयंसेवकांची निवड करण्यात आलेली नाही.
हायपरसॉनिक क्षेपणास्त्र रोखणे महाकठीण
सध्या या क्षेपणास्त्रांना रोखण्याचा कोणताही मार्ग नाही. बऱयाच देशांमध्ये ऊर्जा उपकरणे, अणू कण आणि इतर गती नसलेल्या लहरींच्या माध्यमातून अशी क्षेपणास्त्रे शोधण्याची आणि नष्ट करण्याची क्षमता मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, अद्याप कोणत्याही देशाला यामध्ये निश्चित यश आलेले दिसत नाही.