सेमीकंडक्टरच्या टंचाईमुळे कंपनीचा निर्णय : मूल्यात घसरण होण्याची शक्यता
वृत्तसस्था /नवी दिल्ली
सेमीकंडक्टरच्या कमतरतेमुळे वाहन कंपन्या आतापर्यंत होत असणाऱया नुकसानीमधून सावरण्याचा प्रयत्न करीत आहेत. ऑगस्टमध्ये काही कंपन्यांनी वर्षाच्या आधारे व मासिक आधारे विक्रीत वाढ दर्शवलेली आहे. परंतु त्यांचे म्हणणे असे आहे, की सेमीकंडक्टरच्या टंचाईमुळे विक्री वाढीचा वेग कमी राहिला आहे. हेच कारण पुढे करत महिंद्रा ऍण्ड महिंद्रा कंपनीने चालू महिन्यात सात दिवसांचा ‘नो प्रोडक्शन डे’ आयोजला आहे.
चिपच्या कमतरतेमुळे आपल्या ऑटोमेटिव्ह प्रकल्पांमध्ये 7 दिवसांसाठी उत्पादन थांबवणार आहे. यामुळे सप्टेंबर महिन्यात होणारे उत्पादन जवळपास 20 ते 25 टक्क्यांनी कमी होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
ट्रक्टर-एक्सयूव्हीचे उत्पादन नाही होणार प्रभावीत महिंद्रा ऍण्ड महिंद्राच्या ‘नो प्रोडक्शन डे’च्या दरम्यान ट्रक्टर व तीन चाकी वाहनांचा व्यवसाय प्रभावीत होणार नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. यासह एक्सयूव्ही 700 चे उत्पादन आणि लाँच करण्याच्या योजनेवर कोणताच प्रभाव राहणार नसल्याचेही कंपनीने नमूद केले आहे.