डेस्टिनेशन वेडिंगऐवजी मुंबईत होणार सोहळा
दीर्घ प्रतीक्षेनंतर पवित्र रिश्ताफेम अभिनेत्री अंकिता लोखंडे लवकरच स्वतःचा प्रियकर विक्की जैनसोबत विवाह करणार आहे. हा विवाह चालू महिन्याच्या दुसऱया आठवडय़ात होणार असल्याचे समजते. पण याकरता निश्चित तारीख अद्याप समोर आलेली नाही. या जोडप्याने आता विवाहाची तयारी सुरू करत स्वतःचे जवळचे नातलग आणि मित्रपरिवाराला निमंत्रण पाठविणे सुरू केले आहे.
अंकिता लोखंडे आणि विक्की जैन बॉलिवूडचा ट्रेंड फॉलो न करणार नाहीत. डेस्टिनेशन वेडिंगऐवजी हे जोडपे मुंबईतच एका खासगी सोहळय़ात विवाहबद्ध होणार आहेत. या सोहळय़ासाठी शहरातील पंचतारांकित हॉटेलची निवड करण्यात येणार आहे.
अंकिता-विक्की ही जोडी 12, 13 किंवा 14 नोव्हेंबरला विवाहाच्या बंधनात अडकून शकता. जोडप्याने सोमवारी सकाळी परिचित व्यक्तींना कॉल आणि मेसेज करून विवाह सोहळय़ाची माहिती दिली आहे.
बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव आणि पत्रलेखा देखील चालू महिन्यात विवाह करणार असल्याचे समजते. दोघांनी विवाहाची तयारीही सुरू केली आहे. तसेच विक्की कौशल आणि कॅटरिना कैफ यांच्या विवाहाची देखील चर्चा सुरू आहे.