ब्यूनोस आयरिस
कोव्हिड-19 च्या प्रसारामुळे आतापर्यंत जगात सुमारे 70 हजार लोकांचे बळीं गेले आहेत. 2020 सालातील सर्व टेनिस स्पर्धा लांबणीवर किंवा रद्द करण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनने घेतला असल्याने व्यवसायिक टेनिस सर्कीटचे पुनरागमन चालू वर्षांत होण्याची शक्यता जवळपास मावळली असल्याचे प्रतिपादन अर्जेंटिनाची माजी महिला टेनिसपटू गॅब्रिएला साबातिनीने केले. प्रेंच ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धा तसेच विंबल्डन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता 2021 साली पुन्हा आंतरराष्ट्रीय टेनिसचे नवे वेळापत्रक पाहावयास मिळेल, असे साबातिनीने म्हटले आहे. 1996 साली साबातिनीने आंतराष्ट्रीय टेनिस क्षेत्रातून निवृत्ती पत्करल्यानंतर तिने 1990 साली अमेरिकन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेचे विजेतेपद मिळविले होते. एटीपी आणि डब्ल्यूटीए टूरवरील सर्व स्पर्धा 7 जूनपर्यंत लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत.