एस ऍण्ड पी ग्लोबल रेटिंगच्या अहवालात माहिती सादर : कोरोनामुळे एनपीए 1.9 टक्क्मयांनी वधारणार?
वृत्तसंस्था / मुंबई
देशातील कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत असल्याचे पहावयास मिळत आहे. यामुळे याचा सर्वाधिक फटका अर्थिक क्षेत्राला बसणार असल्याचे अनुमान तज्ञांनी मांडले आहेत. यात सर्वांचा सहभाग असणारे क्षेत्र म्हणजे बँकिंग होय. याचे परिणाम चालू वर्षातील व्यवहारांवर होणार आहेत. यामध्ये चालू वर्षात देशातील बँकांचा एनपीए दर 1.9 टक्क्मयांनी वाढण्याचे संकेत आहेत. पेडिट कॉस्टमध्ये 1.30 टक्क्मयांनी वाढ शक्मय आहे. एस ऍण्ड पी ग्लोबल रेटिंग्सने आशिया पॅसिफिक अहवालात हे अनुमान दिले आहे.या क्षेत्रात बँकांचे पेडिट कॉस्ट 300 अब्ज डॉलरची (22.50 लाख कोटी रुपये) वाढ होण्याचे संकेत आहेत. तर चिनी बँकांचा एनपीए 2 टक्मक्मयांनी आणि पेडिट नुकसान 1 टक्क्मयांनी वधारण्याचा अंदाज आहे.
बँकिंग क्षेत्रातील रेटिंग हे सरकार आणि केंद्रीय बँकांच्या उपाययोजनांर निश्चित होणार आहे. कोरोनाचा वाढता विळखा हा बँकिंग क्षेत्राच्या अडचणी वाढविण्याचे संकेत आहेत. परंतु त्यात योग्य वेळी उपायायोजना केल्यास दिलासा मिळण्याच्या आशा या अहवालतून व्यक्त केल्या आहेत.
आशिया-पॅसिफिक बँकांचा एनपीए
रेटिंग संस्था पेडिट विश्लेषक गेविन गनिंग यांच्या मतानुसार कोरोनाच्या संसर्गामुळे आगामी दिवसांमध्ये खुप कठिण स्थिती निर्माण होण्याची भीती असून याचा जास्त कालावधीपर्यंतचा प्रभाव आर्थिक क्षेत्र अडचण राहणर आहे. यात आशिया-पॅसिफिकच्या बँकांचा एनपीए 600 अब्ज डॉलरने (45 लाख कोटी रुपये) वाढण्याचा अंदाज गनिंग यांनी व्यक्त केला आहे.