प्रतिनिधी / सातारा
सातारा जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या 40 नागरिकांना संध्याकाळपर्यंत घरी सोडण्यात आले असून 330 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
330 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 38, कराड येथील 49,फलटण येथील 11, कोरेगाव येथील 17, वाई येथील 47, खंडाळा येथील 4, रायगाव येथील 9, पानमळेवाडी येथील 23, महाबळेश्वर येथील 10, दहिवडी येथील 17, तळमावले येथील 58,कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथील 47 असे एकूण 330 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
एकूण नमुने -300814
एकूण बाधित -55480
घरी सोडण्यात आलेले -52946
मृत्यू -1804
उपचारार्थ रुग्ण-730