ऑनलाईन टीम / : चेन्नई :
तामिळनाडूमध्ये आज दिवसभरात 5,890 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 120 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे तामिळनाडूतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 3 लाख 43 हजार 945 वर पोहचली आहे. यामधील 54 हजार 122 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दिलासादायक बाब म्हणजे आज 5,667 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहेे. तर आतापर्यंत 2 लाख 83 हजार 937 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 5,886 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे तामिळनाडू मधील नागरिकांमध्ये चिंता वाढली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ताज्या आकडेवारी नुसार, सोमवारी तामिळनाडूमध्ये आरटीपीसीआरचे 67,532 नमूने घेण्यात आले आणि त्यातील 65, 643 टेस्ट करण्यात आल्या. तर आतापर्यंत एकूण 37 लाख 78 हजार 778 नमूने घेण्यात आले असून आता पर्यंत 36 लाख 47 हजार 582 टेस्ट करण्यात आल्या आहेत.