- मागील 24 तासात 28,395 नवे बाधित; 277 मृत्यू
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
राजधानी दिल्लीत कोरोना रोज नवे नवे उच्चांक गाठत आहेत. परिस्थिती अधिक भयंकर होत चालली आहे. कोरोना रुग्णांनी 9.5 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. त्यातच मंगळवारी 28 हजार 395 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. तर 277 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे दिल्लीतील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 9 लाख 05 हजार 541 वर पोहोचली आहे. तर संक्रमणाचा दर वाढून 32.82 % इतका झाला आहे.
त्यातच मागील 24 तासात 19,430 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आतापर्यंत 08 लाख 07 हजार 328 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 12,638 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सद्य स्थितीत 85 हजार 575 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दिल्लीत आतापर्यंत जवळपास 1 कोटी 64 लाख 05 हजार 232 टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यातील 56,724 आरटीपीसीआर टेस्ट आणि 29,802 रैपिड एंटिजेन टेस्ट काल एका दिवसात करण्यात आल्या आहेत. सद्य स्थितीत दिल्लीत 17,151 झोन आणि 1282 कंट्रोल रूम आहे.