ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्लीत मागील 24 तासात दिल्लीत 8 हजार 593 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 85 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्लीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 4 लाख 59 हजार 975 वर पोहचली आहे. यामधील 42,629 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दिलासादायक बाब म्हणजे काल दिवसभरात 7,264 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहेे. तर आतापर्यंत 4 लाख 10 हजार 118 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 7,228 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्ली वासियांची चिंता वाढली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ताज्या आकडेवारी नुसार, दिल्लीत आतापर्यंत जवळपास 52 लाख 62 हजार 045 टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यातील 19,304 आरटीपीसीआर टेस्ट आणि 44,817 रैपिड एंटिजेन टेस्ट करण्यात आल्या आहेत.
सद्य स्थितीत कोरोना संसर्गाचे प्रमाण 13. 40 % आहे. तर 4016 झोन आणि 341 कंट्रोल रूम आहेत.