- रविवारी 10,442 नवे रुग्ण; 7,504 डिस्चार्ज
ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या प्रमाणात घट होत असली तरी राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही कायम आहे. रविवारी पुन्हा एकदा रुग्ण संख्येत वाढ झाली. मागील 24 तासात 10 हजार 442 नवीन कोरोनाबाधित आढळले असून 7,504 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कालच्या दिवशी 483 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांची वाढती संख्या पुन्हा एकदा चिंतेचा विषय बनला आहे.
राज्यात आजपर्यंत एकूण 56 लाख 39 हजार 271 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.44 टक्के इतके झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.88 टक्के एवढा आहे.
दरम्यान, आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,80,46,590 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 59,08,992 (15. 97 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 9,62,134 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 6,160 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात सद्य स्थितीत 1 लाख 55 हजार 588 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
- मुंबई : काल 704 जणांना दिला डिस्चार्ज !
मुंबईत मागील 24 तासात 700 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले. तर 19 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना रुग्णांची एकूण संख्या 7,16,579 वर पोहचली असून सद्य स्थितीत 15,773 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 15,183 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रुग्ण दुप्पतीचा काळ 653 दिवस इतका आहे.