ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग लक्षणीय प्रमाणात वाढत आहे. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतो आहे. त्यामुळे राज्यात सध्या 15 दिवसांची संचारबंदी लावण्यात आली आहे. सरकारकडून निर्बंध देखील अधिक कडक करण्यात आले आहेत. तरी देखील रुग संख्येत आणि मृत्यू संख्येतही मोठ्या प्रमाणावर वाढ सुरू आहे. मुंबई, पुणे आणि नागपूर शहरात तर कोरोनाने हाहाकार माजला आहे.
- मुंबईत 8,479 नवे बाधित ; 53 मृत्यू
दरम्यान मुंबई – पुणे – नागपूर शहरातील वाढत्या रुग्ण संख्येमुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. मुबंईत गेल्या 24 तासात 8,479 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 53 जणांनी आपला जीव एका दिवसात गमावला आहे. कालच्या दिवशी 8078 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आजवर 4 लाख 78 हजार 039 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर बरे झालेल्या रुग्णांचा दर 82 टक्के आहे. सध्या मुंबईत एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 87 हजार 698 आहे. तर रुग्ण दुप्पटीचा दर 45 दिवसांवर आला आहे.
- पुणे जिल्ह्यात 12, 707 रुग्णांची नोंद
पुणे जिल्ह्यात रविवारी दिवसभरात 12 हजार 707 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 116 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर 9,415 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 7 लाख 22 हजार 476 वर पोहोचली आहे. यातील 6,07, 597 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सद्य स्थितीत 1,03, 620 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर 11,420 जणांचा मृत्यू झाला आहे.
- नागपूरमध्ये दिवसभरात 7, 107 रुग्ण
नागपूरमध्ये मागील 24 तासात 7,107 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 85 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहरात कोरोना रुग्णांची एकूण संख्या 3 लाख 23 हजार 106 वर पोहोचली आहे. यातील 2 लाख 47 हजार 590 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सद्य स्थितीत नागपूरमध्ये 69,243 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत 6,273 जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला.
तर महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 38 लाख 39 हजार 338 वर पोहोचली असून सद्य स्थितीत 6 लाख 70 हजार 388 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 60 हजार 473 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे.