ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने फैलावत आहे. त्यातच आतापर्यंत एकूण 15 हजार 591 पोलिसांना कोरोनाची लागण झाली तर आतापर्यंत 158 पोलिसांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे पोलिसांमध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत आढळलेल्या 15,591 कोरोनाबाधित पोलिसांमध्ये 1690 पोलीस अधिकारी आणि 13,901 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर आतापर्यंत 12 हजार 640 पोलीस कर्मचाऱ्यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये 1293 पोलीस अधिकारी आणि 11,347 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
सद्यस्थितीत राज्यात 2793 कोरोनाबाधित पोलीस कर्मचाऱ्यांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यामध्ये 382 पोलीस अधिकारी आणि 2411पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर आतापर्यंत झालेल्या 158 मृत्यूंमध्ये 15 पोलीस ऑफिसर आणि 143 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.