ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. राज्यात मंगळवारी पुन्हा एकदा 6 हजार पेक्षा अधिक नव्या रुग्णांची नोंद झाली. काल 6,218 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले, तर 51 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 21 लाख 12 हजार 312 वर पोहचली आहे. तर मृतांचा एकूण आकडा 51 हजार 857 एवढा आहे.
कालच्या एका दिवसात 5,869 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर राज्यात आतापर्यंत 20 लाख 05 हजार 851 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.96 % आहे. सद्य स्थितीत राज्यात 53 हजार 409 रुग्ण उपचार घेत आहेत.
प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 1 कोटी 58 लाख 60 हजार 912 नमुन्यांपैकी 21 लाख 12 हजार 312 (13.32%) रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात लोक होम 2 लाख 79 हजार 288 क्वारंटाईनमध्ये असून, 2 हजार 484 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.