ऑनलाईन टीम / अकोला :
अकोल्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शनिवारी सकाळी अकोल्यामध्ये 5 नवे रुग्ण आढळून आले. तर दोन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 978 वर पोहोचली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या लॅबकडून 67 अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील 5 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पाच पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये चार पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे.
आज आढळलेले 5 रुग्ण हे रजपुतपुरा, गायत्रीनगर, हरिहरपेठ, बाळापुरा व बोलोदे लेआऊट हिंगणारोड येथील रहिवासी आहेत.
दरम्यान, सध्या जिल्ह्यातील एकूण 978 रुग्णांपैकी 326 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आता पर्यंत 606 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर कोरोना बळींची आकडा 46 वर पोहोचला आहे.