ऑनलाईन टीम / देहरादून :
उत्तराखंडमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे. मंगळवारी उत्तराखंडात 571 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 20 हजार 398 वर पोहचली आहे, अशी माहिती आरोग्य सचिव युगल किशोर पंत यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, काल 10,127 29 रिपोर्ट निगेटिव्ह आले. काल आढळलेल्या 571 रुग्णांमध्ये अलमोरा जिल्ह्यात 29 , बागेश्र्वर 7, चमोली 3, चंपावत 25, देहरादून 169, हरिद्वार 63, नैनिताल 106 पौरी गरवाल 22, पिथोरगड 0, रुद्र प्रयाग 6,तेहरी गरवाल 42, यू एस नगरमधील 79 आणि उत्तर काशीमधील 20 जणांचा समावेश आहे.
दरम्यान, उत्तराखंड राज्यातील एकूण 20 हजार 398 रुग्णांपैकी आतापर्यंत 14,012 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 68.69 टक्के इतके आहे. तर सध्या 6 हजार 064 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर आतापर्यंत 280 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, असे पंत यांनी यावेळी स्पष्ट केले.