ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असतानाच दिल्लीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. दिल्लीतील कापसहेडा येथील ठेकेवाली परिसरातील एका इमारतीमध्ये 41 जणांना कोरोना ची लागण झाली आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळलेल्या अधिक माहितीनुसार, 18 एप्रिल रोजी या इमारतीतील एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यांनतर संपूर्ण इमारतीला सील करण्यात आले होते. इमारतीतील सर्व लोकांची कोरोनाची चाचणी घेण्यात आली. त्याचा रिपोर्ट काल आला असून या रिपोर्ट मध्ये जवळपास 41 जणांना कोरोनाची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.
दरम्यान, दिल्लीत आत्तापर्यंत 3 हजार 738 लोकांना कोरोनाची बाधा झाली असून 61 जणांनी आपला जीव गमावला आहे.
तर संपूर्ण देशात हा आकडा 37 हजार पेक्षा अधिक असून आत्तापर्यंत 1248 जणांनी आपला जीव गमावला आहे. तर 9 हजार 951 जणांची प्रकृती स्थिर असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.