ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत कोरोना रुग्णांनी 2 लाखांचा टप्पा पार केला आहे. मागील 24 तासात सर्वाधिक म्हणजेच 4039 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 20 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्लीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 2 लाख 01 हजार 174 वर पोहचली आहे. यामधील 23,773 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात 2623 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहेे. तर आतापर्यंत 1 लाख 72 हजार 763 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 4638 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्ली वासियांची चिंता वाढली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ताज्या आकडेवारी नुसार, दिल्लीत आतापर्यंत जवळपास 19 लाख 03 हजार 780 टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यातील 11,101 आरटीपीसीआर टेस्ट आणि 43,416 रैपिड एंटिजेन टेस्ट करण्यात आल्या आहेत.
सद्य स्थितीत कोरोना संसर्गाचे प्रमाण 10.57 % आहे. तर 1226 झोन आणि 155 कंट्रोल रूम आहेत.