ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतात कोरोनाची रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मागील 24 तासात 9996 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 357 रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या आता 2 लाख 86 हजार 579 वर पोहचली असून, मृतांची संख्या 8102 एवढी आहे.
सध्या देशात 1 लाख 37 हजार 448 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 1 लाख 41 हजार 29 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
महाराष्ट्रात आतापर्यंत 94 हजार 41 रुग्ण आढळले आहेत. दिल्ली 32 हजार 802, तामिळनाडू 36 हजार 841, गुजरातमध्ये 21 हजार 521, मध्यप्रदेश 10 हजार 49, आंध्र प्रदेश 5269, बिहार 5710, राजस्थान 11 हजार 651, उत्तरप्रदेश 11 हजार 610 तर पश्चिम बंगालमध्ये 9328 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.