ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. मुंबई शहरात आता धारावी नंतर अंधेरी पूर्व कोरोनाचा नवा हॉटस्पॉट बनला आहे.
मुंबई महपालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, अंधेरी मध्ये आता सर्वात जास्त कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. आता पर्यंत हॉटस्पॉट राहिलेल्या धारावी मध्ये कोरोनाचे 3729 रुग्ण आहेत तर अंधेरी मध्ये ही संख्या 3782 वर पोहोचली आहे. तसेच धारावीच्या तुलनेत अंधेरीत रुग्ण संख्या कमी होण्याचे प्रमाण देखील कमी आहे.
धारावीमध्ये कोरोना संसर्गचा दर 1.4 टक्के आहे. तर अंधेरीत हेच प्रमाण 4.2 टक्क्यांवर आहे. अंधेरी बरोबरच दहिसरमध्ये पण कोरोना बाधीतांची संख्या वेगाने वाढत आहे. दहिसर मध्ये रुग्ण वाढण्याचे प्रमाण 6.5 टक्क्यांवर आहे. तर संपूर्ण मुंबई शहरात हे प्रमाण 2.76 टक्के आहे.