ऑनलाईन टीम / चंदीगड :
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. गेल्या 24 तासात पंजाबमध्ये 357 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे पंजाबमधील कोरोना बाधितांची एकुण संख्या 8178 झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काल राज्यात कोरोनामूळे 5 जणांनी आपला जीव गमावला. यामध्ये अमृतसर मधील 2, जालंधर मधील 3 जणांचा समवेश आहे. तर आतापर्यंत एकूण 204 जणांचा मृत्यू झाला आहे. कालच्या दिवसात 194 जणांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे राज्यात आता पर्यंत 5586 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
आरोग्य विभागाच्या वतीने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात विविध रुग्णालयात 2388 रुग्ण आयसोलेशन वॉर्ड मध्ये आहेत त्यातील 69 रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. मागील चोवीस तासात लुधियाना मध्ये सर्वाधिक 126, तर दुसऱ्या नंबरवर पटियाला asune तेथे 60 जण आढळले. यातील 7 जण हे अन्य राज्यातील आहेत. तर जालंधर मधील 51 जणांचा समावेश आहे. तर आतापर्यंत 400944 संशयित रुग्णांचे नमुने घेण्यात आले आहेत.