ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने फैलावत आहे. त्यातच मागील 24 तासात 348 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली तर एकाने आपला जीव गमावला आहे. त्यामुळे आतापर्यंत एकूण 17 हजार 439 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे पोलिसांमध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत आढळलेल्या 17,439 कोरोनाबाधित पोलिसांमध्ये 1855 पोलीस अधिकारी आणि 15,584 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर आतापर्यंत 14 हजार 037 पोलीस कर्मचाऱ्यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये 1453 पोलीस अधिकारी आणि 12,584 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
- आतापर्यंत 177 जणांचा मृत्यू
सद्यस्थितीत राज्यात 3225 कोरोनाबाधित पोलीस कर्मचाऱ्यांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यामध्ये 386 पोलीस अधिकारी आणि 2839 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर आतापर्यंत झालेल्या 177 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. मृत्यूंमध्ये 16 पोलीस ऑफिसर आणि 161 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.