प्रतिनिधी / सोलापूर
सोलापुरात शनिवारी नव्याने 20 कोरोना बाधीत रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये कोरोनाने 14 वा बळी घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितसंख्या 216 वर पोहचली असून उर्वरित 176 व्यक्तींवर सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.
मृत्यू झालेली महिला 48 वर्षाची अशोक चौक परिसरातील रहिवासी होती. सात मे रोजी तिला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते . दुपारी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला त्यानंतर रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. आज एकूण 175 अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 155 जणांचा रिपोर्ट निगेटिव आला तर वीस जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. आजच्या कोरोना चाचणीत 12 पुरुष , आठ महिला पॉझिटिव्ह आढळले.
यापैकी शास्त्रीनगर 6, कुमठा नाका 2, नही जिंदगी एक, अशोक चौक 1, एकता नगर 2, नीलम नगर 2 , केशव नगर 1 , मनोरमा विजापूर रोड 1, सदर बाजार लष्कर 1 , लष्कर कुंभार गल्ली 1, बापुजी नगर 1 असे 20 रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 216 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत जिल्ह्यात 29 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
सोलापूरातील कोरोना सद्यस्थिती
होम क्वरटाईनमध्ये : 2993
एकूण अहवाल प्राप्त : 2840
आतापर्यंत अहवाल निगेटीव्ह : 2624
आतापर्यंत अहवाल पॉझीटीव्ह : 216
अहवाल प्रलंबित : 153
बरे होऊन घरी गेले : 29
मृत- 14