आचरा / प्रतिनिधी-
चिंदर गावठणवाडी शाळा नंबर १ च्या हाँल मध्ये चिंदर ग्रामपंचायतच्या माध्यमातून २० बेडच्या कोविड ग्राम विलिगीकरण कक्षाचे उद्घाटन मालवण पंचायत समिती सभापती अजिंक्य पाताडे व उपसभापती राजू परुळेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, जि.प. सदस्य जेराँन फर्नांडिस, सरपंच सौ राजश्री कोदे, भाजप तालुका अध्यक्ष धोंडू चिंदरकर, हडी सरपंच महेश मांजरेकर, उपसरपंच दिपक सुर्वे, तंटामुक्ती अध्यक्ष संतोष गांवकर, आचरा आरोग्यकेंद्र वैधकीय अधिकारी डाँ. शामराव जाधव, आरोग्य सेवक संतोष गोसावी, जंगले सिस्टर, , सामाजिक कार्यकर्ते भाई तावडे, नारायण पाताडे, प्रभाकर पाताडे, केंद्रप्रमुख प्रसाद चिंदरकर, उद्योजक प्रकाश मेस्री, देवेंद्र हडकर,महेंद्र मांजरेकर, रणजीत दत्तदास,विश्राम माळगावकर, आबा पवार, विवेक परब, दिगंबर जाधव, दुर्वा पडवळ, स्वरा पालकर,संजय लोके, वेदा लब्दे, प्रिया पालकर,सानिका चिंदरकर, रिया घागरे, दत्ता वराडकर, निलेश रेवडेकर आदी उपस्थित होते.