शहापूर येथील घटनेने खळबळ, एकाला अटक
प्रतिनिधी/ बेळगाव
चिकन खरेदी करण्यासाठी गेलेल्या व्यक्तीने चिकनचा दर विचारून चिकन विक्री करणाऱया व्यापाऱयाशी अरेरावी केली. त्यानंतर मला चिकन उधारी हवे आहे ते दे, असे म्हटले. त्यावर दुकानदाराने चिकन उधारी देण्यास नकार दिला. यामुळे चिडलेल्या ग्राहकाने दुकानदारावरच चाकूने हल्ला केल्याची घटना शहापूर येथील पाटील गल्ली-खासबाग येथे घडली आहे.
सचिन मोहन तुप्पारे (रा. बसवाण गल्ली-होसूर, शहापूर, सध्या रा. संभाजी रोड-खासबाग) हा चिकन दुकानदार सज्जद मेहबुब मकानदार (वय 32, रा. पाटील गल्ली-खासबाग) याच्याकडे चिकन घेण्यासाठी गेला होता. यावेळी सचिनने चिकन कसे किलो आहे, असे विचारले. सज्जद याने 160 रुपये किलो आहे असे सांगितले. दुसऱया दुकानदाराकडे दर कमी आहे, तुझ्याकडे इतका का? असे विचारले. त्यावर तेथे दर कमी असेल तर तू तेथेच चिकन घे, असे सांगितले.
सचिनने मला उधारी चिकन पाहिजे आहे, असे म्हटले. त्यावर मी उधारी चिकन देणार नाही, असे सज्जद याने सांगितले. यावेळी वादावादी झाली. सचिनने अचानक चिकन स्वच्छ करण्याच्या चाकूनेच सज्जद याच्यावर हल्ला केला. यावेळी डोक्मयावर घाव पडतो म्हणून त्याने मान बाजूला केली. त्यावेळी खांद्यावर चाकूचा वार झाला. त्यानंतर पुन्हा वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र सज्जद याने आरडाओरड केल्यामुळे घरातील तसेच शेजारी धावून आले.
त्यानंतर त्याला सोडवून घेतले. यावेळी सचिनने जीवे मारण्याची धमकी दिल्याचे या फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी सचिन मोहन तुप्पारे याच्यावर शहापूर पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. शहापूरचे पोलीस निरीक्षक राघवेंद्र हवालदार व त्यांचे सहकारी पुढील तपास करीत आहेत.