2.5 कोटीचा प्रकल्प
प्रतिनिधी /संकेश्वर
राजेश्वरी विश्वनाथ कत्ती चॅरिटेबल ट्रस्ट व जिल्हा मध्यवर्ती बँक यांच्या संयुक्त विद्यमाने ऑक्सिजन प्रकल्प चिकालगुड्ड (ता. हुक्केरी) येथे उभा करण्यात आला आहे. या महत्वकांक्षी प्रकल्पाने उद्घाटन शुक्रवारी करण्यात आले. या शुभारंभाला निडसोशी मठाचे श्री शिवलिंगेश्वर स्वामीजींचे दिव्य सानिध्य लाभले होते.
राजेश्वरी विश्वनाथ कत्ती चॅरिटेबल ट्रस्ट 80 क्युनीक क्षमतेचा आहे. हवेतील ऑक्सिजनचा उपसा करुन 5 के. जी. वजनाचे 280 सिंलेडर उत्पादन करणारे युनिट आहे. अवघ्या 45 मिनीटात 12 सिंलेडर भरले जातात. तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेवतीने दुसरा युनिट सुरु करण्यात आला आहे. 100 क्युनीक क्षमतेचा युनिट आहे. रासायनीक द्रव्याच्या सहाय्याने ऑक्सिजन तयार करुन 250 सिंलेडर भरले जातात. दोन्ही प्रकल्पात एकूण 50 कामगार सेवेत आहेत. अवघ्या तीन महिन्यात प्रकल्प उभा करण्यात आला आहे. शासनाच्या नियमानुसार प्रकल्पाचे नियोजन करण्यात आले आहे.
उत्पादीत होणाऱया ऑक्सिजनचे सामाजिक संस्था, कारखाने, इस्पितळे, विविध कंपन्याना सिंलेडर पुरवठा करण्यात येणार आहेत. गरीब वर्गासाठी सिंलेडर मोफत पुरवठा केला जाणार आहे. येथील हिरण्यकेशी सहकारी साखर कारखाना, संगम सहकारी साखर कारखाना व विश्वनाथ शुगर या तीनही कारखान्याना 30 वर्ष सिंलेडर पुरवठा करण्याचा रितसर करारही केला असल्याची माहिती यावेळी पवन कत्ती यांनी दिली. हा प्रकल्प एक एकर जमिनीत उभा करण्यात आला असून तालुक्यात हा पहिलाच प्रकल्प आहे. कोरोना रुग्णांना ऑक्सिजनची नितांत गरज आहे. ऑक्सिजनमुळेच तो जगू शकतो. ही सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन प्रकल्प उभा केला असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.
कार्यक्रमास जिल्हा पंचायत सदस्य पृथ्वी कत्ती, हिराशुगचे चेअरमन निखील कत्ती, संगमचे चेअरमन राजेंद्र पाटील, माजी नगराध्यक्ष श्रीकांत हतनूरी, अमर नलवडे, स्थायी समिती सभापती सुनिल पर्वतराव, उद्योजक अभिजीत कुरणकर, डॉ मंदार हावळ, हिराशुगरचे वरिष्ठ लिपीक जयसिंग सनदी, नगरसेवक संजय नष्टी, नंदकुमार मुडशी, रोहनि नेसरी, डॉ. उदय कुडची, डॉ. दत्तात्रय दोडमनी, डॉ. रमेश दोडभंगी, डॉ. सचिन मुरगुडे, डॉ. विकास पाटील, डॉ. शशिकांत कोरे, महेश देसाई, संतोष कमनूरे, प्रशांत पाटील, पवन पाटील, राहूल हंजी, जयप्रकाश सावंत आदी उपस्थित होते.