लष्करी अधिकारीपदी कोकणची तिसरी युवती : सिक्कीम गंगटोक येथे कार्यरत : लष्करात उंचावली कोकणची पताका
अरूण आठल्ये / रत्नागिरी
सैन्य दलात काम करून देशसेवा करण्याच्या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर भारतीय सैन्यदलात मेजर पदापर्यंत पोहोचण्याचा बहुमान दापोलीच्या रणरागिणी मैत्रेयी दांडेकर यांनी मिळवला आह़े अथक परिश्रमाद्वारे सैन्यदलात वेगळा ठसा उमटविणाऱया मैत्रेयी गंगटोक-सिक्किम सेना सेवा दलात मेजरची धुरा सांभाळत आहेत़
लष्करी पेशा स्वीकारणारी मैत्रेयी ही कोकणची तिसरी युवत़ी पहिली मेजर सलोनी सरपोतदार (लांजा) दुसरी मेजर मेहिनी चव्हाण (दापोली) तर तिसरी मैत्रेयी ही ड़ॉ राजा दांडेकर व रेणू दांडेकर या ध्येयवादी जोडप्याची महत्वाकांक्षी मुलग़ी चिखलगावमध्ये गोठय़ात शाळा सुरू करण्यापासून लोकमान्य विद्यामंदिराचा एक वेगळा शैक्षणिक प्रयोग आज प्रसिद्ध आह़े त्यांच्या मुलीने चौथीत असताना कारगील युद्धदरम्यान सैन्यात जाण्याचे स्वप्न पाहिले आणि ते जिद्दीने पूर्ण केल़े तिची ती अथक धडपड, प्रचंड कष्ट आणि आजच्या तिचे कणखर व्यक्तिमत्वाचे कौतुक करावे तेवढे थोडेच़
सैन्यदलात रसद पुरवणे ही एक महत्वाची व तेवढीच खडतर जबाबदारी मानली जाते. गाडय़ा, प्राणी, अन्नपदार्थ, रेशन वेळेत पुरवणे हे अत्यंत जिकिरीचे काम आहे. भौगोलिक अडचणी, नैसर्गिक आपत्तींना तांड देत आपल्याकडील साधनसामुग्रीचे रक्षण करतानाच आपली मानसिक व शारीरिक परिस्थिती धडधाकट ठेवावी लागत़े मेजर मैत्रेये आसाम, अरूणाचल, उत्तराखंड, जयपूर व सिक्कीम (गंगटोक) अशा दुर्गम भागात सगळ्या आव्हानात्मक जबाबदाऱया सैन्यसेवा दलात पार पाडत आहेत़ या विभागाचे अत्यंत खडतर प्रशिक्षण मेजर मैत्रेयीने चैनई येथे घेतल़े तिचे पाचवीपर्यंतचे शिक्षण दापोली येथे तर सहावी ते दहावीचे शिक्षण झाशीची राणी मुलींची सैनिकी शाळा-पिरंगूट येथे झाल़े 210 क़ि म़ी अंतर वेगवेगळ्या पाच प्रकारे पूर्ण करणे, रायफल शुटींग, रिव्हर राफ्टिंग, रिव्हर क्रॉसिंग, क्रॉस कंट्री आदी सराव पहाटे 3 पासून करण्याचा यामध्ये उल्लेख करावा लागेल. एस़ प़ी कॉलेजमध्ये असतानाच ती स्टाफ सिलेक्शन बोर्डातर्फे घेण्यात आलेल्या देशपातळीवरील परीक्षेत उत्तीर्ण झाल़ी
मैत्रेयीला ऑफिसर्स ट्रेनिंग ऍपॅडमीमध्ये बेस्ट पॅडेट मेडल मिळाल़े तिच्या कंपनीला एकूण 15 ऍवार्डस मिळाल़ी त्यातील 1 ऍवार्ड मैत्रीयेला वैयक्तिक प्राप्त झाले होत़े सध्या ती सिक्कीम-गंगटोक येथे मेजर पदावर कार्यरत आह़े सैन्यात ऑफिसर होण्याचे तिचे स्वप्न 15 वर्षांच्या अथक मेहनतीतून साकार झाले आह़े मैत्रेयीच्या यशामध्ये तिच्या आई-वडिलांचा सिंहाचा वाटा आह़े अंगभूत चिकाटी व हुषारीच्या जोरावर तिच्या यशाची एक-एक शिखरे पादाक्रांत करताना लेफ्टनंट, पॅप्टन ते मेजर हा मैत्रेयीचा प्रवास एकप्रकारे प्रगतीकडे नेणारा आह़े येथपर्यंतचा प्रवास सोपा नक्कीच नव्हता, याची प्रचिती येत़े
शौर्यपरंपरेचा जागर (फोटो घेणे – प़ॅ नारायण दांडेकर, अरविंद दांडेकर)
इतर कुठल्याही पेशापेक्षा परंपरेने चालत आलेला समृद्ध वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी नव्या दमाची तरूणाई सैन्यात निश्चित अधिक आह़े दांडेकर घराण्याला 1942 पासून लष्करी सेवेचा वारसा आह़े पॅप्टन नाराया दांडेकर (मैत्रेयीचे आजोबा) हे रॉयल ब्रिटिश आर्मीत होत़े दुसऱया महायुद्धात त्यांचा सहभाग होत़ा अरविंद दांडेकर (काका) यांनाही संयुक्त राष्ट्रसंघाचा पुरस्कार, विदेश सेवा मेडल मिळाले होत़े तोच तेजस्वी वारसा मैत्रेयीने पुढे चालू ठेवला आह़े