ग्रामपंचायतीकडून 9 तारखेपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन
दत्ता कोळी / मायणी
चितळी गावाची एप्रिल महिन्याची सुरुवात नागरिकांच्या मनात धडकी भरवणारी झालीं असून सुरुवातीच्या 10 कोरोना रुग्ण संख्येत दोन दिवसात 13 कोरोना रुग्णाची भर पडून सध्या ऍक्टिव्ह कोरोना रुग्णाची संख्या 23 वर पोहचल्याने चितळी ग्रामपंचतीकडून 9 एप्रिल पर्यंत संपूर्ण लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सर्वत्र कोरोनचा आकडा झपाटय़ाने वाढत चालल्याने शासनाने कठोर निर्बंध तसेच शनिवार रविवार संपूर्ण लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे .चितळी गावात एकूण रुग्णसंख्या 23 वर पोहचल्याने संपूर्ण गावाचे दळणवळण थांबले असून या भागात संपूर्ण लॉकडाऊन करण्याची नामुष्की चितळी वर आली आहे.
यावेळी चितळी आरोग्य केंद्र येथे कोरोनाची लस उपलब्ध करून देण्यात आली असून आज अंदाजे शंभर लोकांनी या लसीकरणाचा लाभ घेतला असून गावातील 45 वयोवर्षाच्या वरील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा व कोरोना पासून आपला बचाव करावा, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ सुशील तुरुकमाने यांनी केले आहे.