प्रतिनिधी /बेळगाव
हिंडलगा रोड विनायकनगर येथील गॅरेज कॅफेमध्ये चित्रकला प्रदर्शन व पाश्चिमात्य खाद्य महोत्सवाला दि. 11 पासून प्रारंभ झाला. 18 फेब्रुवारीपर्यंत हा महोत्सव चालणार आहे. बेळगाव शहरात प्रथमच खाद्य व कलाप्रेमींसाठी एकत्र असा खास कार्यक्रम आयोजित केला गेला आहे.
यापूर्वीही प्रशस्त अशा गॅरेज कॅफेच्या प्रांगणात विविध अन्नोत्सवाचे आयोजन केले होते. त्याला बेळगावकरांनी उत्तम प्रतिसाद दिला होता. या चित्रकला प्रदर्शनात बेळगावातील उभरत्या चित्रकारांना आपली चित्रकला सादर करण्याची चांगली संधी मिळाली आहे. या प्रदर्शनात बोहो, पारंपरिक वारली, मधुबनी, पिचवारी, भुली ह्यांचा समावेश आहे. आधुनिक चित्रांचा समावेशही आहे. विविध प्रकारची रेखांकित शुभेच्छापत्रे व चित्रे देखील या प्रदर्शनात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. इनडोअर गेम्स आणि सुमधुर संगीताच्या तालावर प्रेमींसाठी खास विविध प्रकारच्या खाद्य पदार्थांची रेलचेल या उत्सवात असून दररोज दुपारी 12.30 ते रात्री 9.30 पर्यंत हा उत्सव चालणार आहे.
गार्लिक चिकन नगेट्स, चिजी मशरुम, पॅनको फ्राईड प्रॉन्ज रोस्टेड वेजिटेबल लाजानीये व इतर अनेक पाश्चिमात्य पदार्थ ह्या खाद्य महोत्सवात बेळगावकरांसाठी उपलध असतील. गॅरेज कॅफे हे बेळगावातील तरुणाईचे खास आकर्षण तर आहेच त्या सोबत परिवारासाठी, स्नेहसंमेलनासाठी सुद्धा आदर्श ठिकाण आहे. बेळगाव शहरातील कला व खाद्यप्रेमींनी या प्रदर्शनात भाग घ्यावा, असे आयोजकांतर्फे आवाहन करण्यात आले आहे.