आदिपुरुषचे दिग्दर्शक ओम राऊतचे विधान, 7000 वर्षे जुनी कथा दर्शविणे सोपे नाही
प्रभास या अभिनेत्याच्या ‘आदिपुरुष’ या चित्रपटाचे चित्रिकरण अलिकडेच मुंबईतील एका स्टुडिओत सुरू होते. या चित्रिकरणादरम्यान सुमारे 200 जणांचा क्रू सेटवर हजर असायचा. पण दिग्दर्शक ओम राउत सर्व कोविड दिशानिर्देशांचे पालन करत होते. निर्माते चित्रिकरण रोखण्याच्या मताचे नव्हते. पण कोरोनाच्या दुसऱया लाटेने चित्रिकरण थांबवावे लागले आहे.
हा चित्रपट 3डी तंत्रज्ञानाने चित्रित केला जातोय. आम्हाला 7 हजार वर्षांपूर्वीच पृथ्वी दाखवायची आहे. बहुधा रावण ही जगातील सर्वात अवघड व्यक्तिरेखा आहे. याकरता सैफ अली खानची निवड केली कारण तो प्रत्येक व्यक्तिरेखा पूर्णपणे झोकून देत साकारतो असे उद्गार दिग्दर्शक ओम राउतने काढले आहेत. चित्रपटाच्या संशोधनाकरता 19 वर्षांचा कालावधी लागला आहे. हजार वर्षांपूर्वीची पृथ्वी दाखविणे सोपे नाही. पटकथा आणि नियोजनानुसारच काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
इतिहास अन् पुराणात स्वारस्य
मला नेहमीच इतिहास आणि पुराणात मोठे स्वारस्य राहिले आहे. काही गोष्टी किंवा व्यक्तिरेखा वाचत असताना त्या खूपच आवडू लागतात. मी लहानपणी आजी-आजोबांकडून गोष्टी ऐकल्या आणि त्यामुळे प्रभावित राहिलो आहे. मला अशाच विषयांवर काम करण्याची इच्छा असल्याचे राउत यांनी म्हटले आहे.