सारा अली खानने दिली माहिती
अभिनेत्री सारा अली खान सध्या ओटीटी प्लॅटफॉर्म जी-5 ची नवी कॅम्पेन ‘देखते रह जाओगे’चा चेहरा ठरली आहे. या पार्श्वभूमीवर तिने एका मुलाखतीत मन मोकळे केले आहे. पटकथा सर्वात महत्त्वाची असल्याचे मला वाटते. कथा चांगली असल्यास चित्रपटगृह का ओटीटी हे महत्त्वाचे ठरत नाही. चांगली संधी मिळाल्यास मी आनंदाने ओटीटी प्लॅटफॉर्मवर काम करणार असल्याचे साराने म्हटले आहे.
मागील वर्षी मे काही रिमेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. आता काही ओरिजिनल करण्याची संधी मिळाल्यास चांगले ठरेल. मी आतापर्यंत 5 चित्रपटांमध्ये काम केले आहे. प्रत्येक चित्रपटात दिग्दर्शक सांगेल त्यानुसारच मी काम करत आल्याचे सारा सांगते.
माझ्या प्रत्येक चित्रपटात दिग्दर्शक आणि सह-कलाकार अत्यंत चांगले असल्याने पालकांची विशेष मदत घ्यावी लागलेली नाही. ‘केदारनाथ’ची काही दृश्ये मी वडिलांसोबत (सैफ अली खान) बसून वाचली होती. आईसोबत (अमृता सिंग) तर प्रत्येक चित्रपटाबद्दल चर्चा करते. आईच्या अभिनयाची पद्धत अत्यंत प्रिय आहे. प्रत्येक चित्रपटाकरता मी आईचा सल्ला अवश्य घेतला आहे. सेट अखेरचा दिग्दर्शकाचा असतो आणि रिऍक्शन आम्हाला आमच्या सह-कलाकारांना द्यावी लागत असल्याचे सारा हिने म्हटले आहे.