प्रतिनिधी / बेळगाव
चित्रलोकच्या बैठकीत किशोर काकडे यांनी हिचकी चित्रपटाचा परिचय करून दिला. या चित्रपटात तोतरे बोलणाऱया किंवा बोलण्यात अडथळा येणाऱया व्यक्तींच्या समस्येवर लक्ष वेधण्यात आले आहे.
आपल्याला सलग बोलता येत नाही, अडखळावे लागते, मला टॉरेट सिंड्रोमचा आजार आहे, मधूनमधून मी विचित्र आवाज काढते या कारणास्तव मला 12 शाळांमधून काढण्यात आले. वडिलांनाही याचा राग येतो. मात्र, आई आणि भावाने मला मदत केली आणि मी शिक्षिका होऊ शकले, असे आत्मविश्वासपूर्वक नैना माथूर (राणी मुखर्जी) या चित्रपटात सांगते.
आपण जे स्वप्न पाहिले त्या नोकरीवर रुजू होताना ‘आखीर बच्चे तो है क्मया कर लेंगे आणि देअर आर नो बॅड स्टुडन्ट्स देअर आर ओन्ली बॅड टीचर्स’ असे आपल्या प्राचार्यासमोर नैना सांगते तेव्हा या पात्राच्या प्रेमात पडतो आणि आपल्याला हिचकी आवडतो, असे काकडे म्हणाले.
9 फ हा खडय़ाळ आणि वात्रट मुलांचा वर्ग. वर्गातील बहुसंख्य मुले झोपडपट्टी वस्तीतून आलेली. सर्व शिक्षकांचा हा नावडता वर्ग आणि 9 अ हा आवडता वर्ग कारण तेथील मुले उच्चभ्रू परिवारातील आहेत. मात्र नैना 9 फ या वर्गालाच शिकविण्याची जिद्द ठेवून कामाला लागते. प्रारंभी मुले तिला प्रचंड त्रास देतात व प्राचार्य मुलांना शाळेतून काढण्याचे ठरवितात. तथापि, नैना मुलांचीच बाजू घेते. काही कारणास्तव मुलांना सस्पेंड केले जाते आणि नैना माथूरची परीक्षा सुरू होते.
ती झोपडपट्टीमध्ये जावून मुलांना शिकवू लागते आणि शेवटी 9 फ हा वर्गही 9 अ प्रमाणे घडवते. हा सर्व प्रवास पाहण्यासारखा आहे. काकडे यांच्या निवेदनाबरोबरच सुधीर जोगळेकर यांनी चित्रपटातील काही प्रसंग अधूनमधून जोडून व्हिडिओ अधिकच रंजक केला. गिव्ह देम अ चान्स नॉट चॅरिटी या बाबा आमटेंच्या वाक्मयाप्रमाणे आपल्या आजुबाजुला असणाऱया नैना माथूरला समजून घ्या, असा संदेश हा चित्रपट देतो. प्रारंभी बुलकचे अध्यक्ष निखिल नरगुंदकर यांनी काकडे यांचा परिचय करून दिला.