क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
उदयपूर, राजस्थान येथे झालेल्या राष्ट्रीय सबज्युनियर दिव्यांगांच्या जलतरण स्पर्धेत मुक्तांगण शाळेचा विद्यार्थी चिदंबर पिळणकर याने 2 सुवर्ण, 1 कांस्यपदक पटकावित यश संपादन केले. त्याचे शाळेतर्फे खास अभिनंदन करण्यात आले.
राष्ट्रीय सबज्युनियर जलतरण स्पर्धेत 12 वर्षाखालील गटात चिदंबर पिळणकरने 2 सुवर्ण व 1 कांस्यपदक पटकावित यश संपादन केले. त्याने विकलांगतेवर मात करून जलतरण स्पर्धेत यश संपादन केले आहे. मुक्तांगण इंग्लिश स्कूलच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष एस. एल. गुरव, उपाध्यक्ष एस. एम. जाधव व सचिव डी. एम. राऊळ, मुख्याध्यापिका जे. के. सविता यांनी चिदंबरचा या यशाबद्दल खास गौरव केला. यापूर्वीही चिदंबरने राज्यस्तरीय स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले होते. यावेळी उपमुख्याध्यापिका रूपा देशपांडे, क्रीडा शिक्षक अर्जुन भेकणे व इतर शिक्षक उपस्थित होते.