वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
चीनच्या पहिल्या-30 मोबाईल गेम्सनी मागील वर्षात जगभरामध्ये 9.24 अब्ज डॉलर (67 हजार कोटी रुपये) इतकी कमाई केली आहे. यामध्ये पब्जी सर्वोच्च स्थानी राहिला आहे. बॅटल रॉयल गेम्स पब्जीचा भारतीय व्हर्जन लवकरच सादर करण्यात येणार असल्याची माहिती सेंसर टॉवरच्या अहवालामधून देण्यात आली आहे.
ग्राहकांच्या माहितीची चोरीसंदर्भात प्रकरणे समोर आल्यामुळे भारतामध्ये या गेमला बंदी घातली होती. ज्यानंतर कंपनीने याचे भारतीय व्हर्जन लवकरच सादर करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले होते.
2019 च्या तुलनेत 47 टक्क्यांची वाढ
2019 मध्ये चीनच्या पहिल्या 30 मोबाईल गेम्सने जगभरामध्ये 45 हजार कोटीची कमाई केली होती. म्हणजे 2020 मध्ये या गेम्सची कमाई 47 टक्क्यांनी वाढली होती. सदर गेम्सची सर्वाधिक कमाई जपानमधून झाली आहे. या गेम्सने मागील वर्षात फक्त जपानमधून 2.8 अब्ज (20 हजार कोटी) इतकी कमाई केल्याची नोंद आहे.
मागील दोन महिन्यांमधील निवडक ऍपची मागणी
रँक जानेवारी 2021 डिसेंबर 2020
1……… टेलीग्राम……….. टिकटॉक
2……… टिकटॉक……….. फेसबुक
3……… सिग्नल………….. व्हॉट्सऍप
4……… फेसबुक…………. इंस्टाग्राम
5 व्हॉट्सऍप झूम