ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :
पाकिस्तानने आपल्या विशेष आर्थिक क्षेत्रात चिनी जहाजांना मासेमारी करण्यास परवानगी दिली आहे. इम्रान सरकारच्या या निर्णयाविरोधात स्थानिक मच्छिमारांनी तीव्र आंदोलन छेडले आहे.
पाकिस्तानने सिंध आणि बलुचिस्तानच्या किनाऱ्याजवळ खोल समुद्रात मासेमारी करण्यास चीनला परवानगी दिली आहे. त्यामुळे कराचीत मासेमारीसाठी 20 मोठ्या ट्रॉलर दाखल झाल्या आहेत. पाकिस्तानातील जवळपास 25 लाख जणांचा उदरनिर्वाह मासेमारीवर चालतो. चिनी जहाजांनी खोल समुद्रात मासेमारी केली तर स्थानिक मच्छिमारांना मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे. त्यामुळे स्थानिक मच्छिमारांनी पाकिस्तान सरकार आणि चीनविरोधात जोरदार निषेध सुरू आहे.
वन्य मासेमारीमुळे पाकिस्तानमधील माशांची संख्या आधीच 72 टक्क्यांनी कमी झाली आहे. त्यात चिनी जहाजांनी समुद्री यंत्रणा बिघडेल, त्याचा नाहक तोटा सहन करावा लागेल, असे मच्छिमारांचे म्हणणे आहे.