पीएलएची युद्धसज्जता आली समोर – भारतासाठी विशेष अधिकारी नियुक्त
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीसंबंधी (पीएलए) जगाकडे फारसा तपशील उपलब्ध नाही. कम्युनिस्ट चीन स्वतःच्या सैनिकांचा आकडा प्रसिद्ध करत नाही तसेच सैनिकांकडून वापरल्या जाणाऱया शस्त्रास्त्रांची माहिती देत नाही. अशा स्थितीत अमेरिकेच्या सैन्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या दस्तऐवजातून चिनी सैन्याची अनेक गुपिते समोर आली आहेत. चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी भारताला लागून असलेल्या सीमेवर देखरेख ठेवण्यासाठी पीएलएच्या वेस्टर्न थिएटर कमांडचे नवे कमांडर जनरल वांग हेईजियांग यांना नियुक्त केले आहे.
अमेरिकेच्या सैन्याने चिनी सैन्याशी संबंधित प्रसिद्ध केलेल्या दस्तऐवजाला ‘एटीपी-100.3’ हे सांकेतिक नाव दिले आहे. हा दस्तऐवज 252 पानांचा आहे. यात चिनी सैन्याचे स्वरुप आणि क्षमतेविषयी माहिती देण्यात आली आहे. हा दस्तऐवज अमेरिकेच्या सैन्याच्या प्रशिक्षणाकरता तयार करण्यात आला आहे. याच्या मदतीने कुणीही चीनच्या सैन्याबद्दल अध्ययन करू शकतो.
चीन स्वतःच्या ज्या निर्णयांना बचावात्मक (डिफेंसिव्ह) मानतो, ते दुसऱया देशांसाठी आक्रमक (ऍग्रेसिव्ह) असतात. दक्षिण चीन समुद्रात कृत्रिम बेट तयार करण्याचा निर्णय याचे अचूक उदाहरण असल्याचे अहवालात म्हटले गेले आहे. पण दस्तऐवजात केवळ चीनच्या पायदळाबद्दलच माहिती देण्यात आली आहे. अमेरिकेने हा अहवाल 20 वर्षांपर्यंत चिनी सैन्यावर करडी नजर ठेवल्यावर तयार केलेला आहे.
2035 पर्यंत नवी शस्त्रास्त्र
चीनचे सरकार सध्या सैन्याकरता मोठी गुंतवणूक करून जुन्या शस्त्रांच्या जागी नवी शस्त्रs आणत आहे. 2035 पर्यंत चीन स्वतःच्या सर्व जुन्या शस्त्रास्त्रांना बदलणार असल्याची अपेक्षा आहे. चीन सैन्यवाहनांप्रकरणी अमेरिकेच्या सैन्यापेक्षाही आघाडीवर आहे. चीनकडे 18 राखीव दलांच्या तुकडय़ा देखील आहेत, पण त्यांना युद्धाकरता सज्ज मानले जात नाही.
महत्त्वाच्या ब्रिगेडला नवी शस्त्रास्त्र
चिनी सैन्याच्या सर्वात महत्त्वपूर्ण ब्रिगेडला सर्वप्रथम नवी शस्त्रास्त्रs दिली जातात. त्यांच्याकडून प्राप्त होणारी शस्त्रास्त्रs कमी महत्त्वाच्या ब्रिगेड्सकडे पोहोचविली जातात. भारत आणि चीनच्या सैनिकांदरम्यान लडाखमध्ये अलिकडेच हिंसक झटापट झाली होती, तेव्हा चीनने सीमेवरील शिनिजयांग मिलिट्री डिस्ट्रिक्टमध्ये नवी सैन्य उपकरणे पाठविली होती.
चीनच्या पायदळाचे 3 कमांड
हलक्या वाहनांद्वारे पाठविले जाऊ शकणारे सैन्य
अवजड यंत्रांसाठी पाठविले जाऊ शकणारे सैन्य
चिलखती वाहनांसह पाठविले जाऊ शकणारे सैन्य