लखनौ : उत्तरप्रदेशच्या शाहजहांपूरमध्ये कायद्याच्या विद्यार्थिनीचे कथित लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. पीडित युवतीने न्यायालयात साक्ष देताना माजी केंद्रीय मंत्री चिन्मयानंद उर्फ कृष्णपाल सिंग यांच्या विरोधात केलेले सर्व आरोप नाकारले आहेत. या कारणामुळे तिच्या वकिलानेच तिच्या विरोधात भादंविचे कलम 340 अंतर्गत न्यायालयात याचिका दाखल केली आहे. एमपी-एमएलए न्यायालयाचे विशेष न्यायाधीश पवन कुमार राय यांनी या याचिकेची प्रत पीडिता तसेच आरोपीला देण्याचा आदेश दिला आहे. याप्रकरणी आता 15 ऑक्टोबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे. मागील वर्षी 24 ऑगस्ट रोजी स्वामी शुकदेवानंद कायदा महाविद्यालयात शिकत असलेल्या विद्यार्थिनीने एक चित्रफित प्रसारित करत चिन्मयानंद यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप केला होता. पीडितेच्या वडिलांनी शाहजहांपूर येथील पोलीस स्थानकात याप्रकरणी गुन्हा नोंदविला होता. चिन्मयानंद यांना 20 सप्टेंबर 2019 रोजी मुमुक्ष आश्रमातून अटक करण्यात आली होती. विशेष तपास पथकाने 4 नोव्हेंबर रोजी चिन्मयानंद यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले होते.
Previous Articleजागतिक बँकेकडून गरजू देशांसाठी 88 हजार कोटींचा निधी
Next Article न्यूझीलंडमध्ये शनिवारी सार्वत्रिक निवडणूक
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.