महिंद्रा ऍण्ड महिंद्रा कंपनीचे मत – काही प्रमाणात परिणाम शक्य- जागतिक उत्पादनावर प्रभाव शक्य
नवी दिल्ली
सेमीकंडक्टर आणि चिप यांच्या कमतरतेचा परिणाम पुन्हा एकदा इलेक्ट्रॉनिक्स आणि ऑटोमोबाईल उद्योगावर होत असल्याचे पहावयास मिळाले आहे. सॅमसंगसारख्या कंपनीने तर आपल्या पुरवठय़ात जवळपास 70 टक्क्यांपर्यंत कमी होणार असल्याचे म्हटले आहे.
यामध्ये काही ऑटोमोबाईल कंपन्यांवर पुन्हा एकदा चिपच्या कमतरतेचा परिणाम दिसून येणार असल्याचे संकेत आहेत. मात्र दुसऱया बाजूला महिंद्रा ऍण्ड महिंद्रा कंपनीने मात्र या चिपच्या कमतरतेचा कोणताही प्रभाव राहणार नसल्याचे म्हटले आहे.
चिपमधील कमतरतेमुळे त्याचा उत्पादनावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. परंतु चिपमुळे ग्लोबल उत्पादन प्रभावीत होण्याचे संकेत आहेत. कंपनीने दरम्यान विना चिपसेटच्या कारचे उत्पादन सुरु ठेवले आहे.
परिणाम होईल पण कमी प्रमाणात
जगभरातील कंपन्या चिपच्या कमतरतेमुळे समस्यांचा सामना करत आहेत. परंतु सर्वकाही लवकरच ठीक होणार असून आम्हाला चिपमधील कमतरतेमुळे आगामी काही दिवस उत्पादनात अडचणी निर्माण होण्याची शक्यता असल्याचे महिंद्रा ऍण्ड महिंद्राचे व्यवस्थापकीय संचालक व सीईओ अनेश शाह यांनी नमूद केले आहे.
कंपनी आगामी दिवसांमध्ये आपली सर्वात लोकप्रिय एक्सयूव्ही 700 आणि न्यू स्कॉर्पियोसोबत दुसरी गाडीही लाँच करण्याचे संकेत आहेत. पण त्यासंबंधीची तारीख मात्र कंपनीने स्पष्ट केलेली नाही.