प्रतिनिधी / जयसिंगपूर
चिपरी तालुका शिरोळ येथील अल्पवयीन शाळकरी मुलीस आमिष दाखवून घरातून पळवून नेल्याची फिर्याद जयसिंगपूर पोलीस ठाण्यामध्ये नोंद झाली आहे. याबाबत मुलीचे वडीलांनी अज्ञात व्यक्ती विरोधात फिर्याद नोंदवली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी संबंधित पीडित मुलगी आठवीचे शिक्षण घेत असून रविवारी सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास अज्ञाताने मुलीला घरातून पळवले आहे. सदरची मुलगी ही पाच फुट दोन इंच, अंगाने जाड, नाक सरळ, डावा डोळा लहान, चेहऱ्याने उभट गोल, अंगात खाकी कलरचा टॉप ,काळ्या कलरची लेगीन पॅन्ट, त्यावर काळ्या रंगाचे डिझाईन असलेला कुर्ता ,पायात चप्पल असे तिचे वर्णन आहे. पुढील तपास पोलीस नाईक निकम करीत आहेत.