सांखळी/प्रतिनिधी
सांखळी मतदारसंघात जोराचा पाऊस सुरूच असून यामुळे ग्रामीण तसेच शहरिभागात दरड कोसळणे, झाडे पडून घराचे नुकसान प्रचंड प्रमाणात झाले आहे, वेळगे, सुर्ल,हरवळे विर्डी, आमोणा परिसरात जास्त नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे
विर्डी सांखळी रस्त्यावर दरड कोसळली
मागील आठवडय़ापासून कहर केलेल्या पावसाचा जोर पुन्हा वाढला असून,काल रात्रीपासून मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरु आहे. (शनिवारी ) काहीवेळ वगळता दिवसभर कोसळधार पाऊस पडला. पावसाच्या तडाख्यात काल मध्यरात्री ते शनिवारी दुपारपर्यंत तीन ठिकाणी झाडांची पडझड झाली होती. आमोणे येथे एका घरावर झाड कोसळून घराची मोडतोड झाली. अशी माहिती डिचोली अग्निशमन दलाकडून मिळाली आहे. दरम्यान, कोसळधार पावसामुळे साखळी ते विर्डी या बगलमार्गावर दरडीसह भलामोठा दगड कोसळण्याची घटना घडली. दगड रस्त्यावर कोसळल्याने दुपारपर्यंत या बगलमार्गावरुन अवजड वाहतूक बंद होती. केवळ दुचाकी आणि मोटारगाडय़ांना वाहतूक करायला मिळत होती. अशी माहिती स्थनिकांनी दिली
सुर्ला सिया बांध कडेची दरड कोसळली
सतत पडणाऱया पावसामुळे सुर्ला सिया बांध या ठिकाणी रस्त्या कडेची दरड कोसळल्याने वाहन चालकांना धोका निर्माण झाला आहे तेव्हा त्वरित दुरुस्त करावी अशी मागणी केली जात आहे स्थनिक पंच महेंद्र शिरोडकर, जिल्ह्य पंचायत सदस्य गोपाळ सुर्लकर यांनी पाहणी करून त्वरित काम करण्याचे आश्वासन दिले