चिपळूण
शहरातील खेंड येथे राहणाऱया एका 15 वर्षीय बालिकेला फूस लावून तिचे अपहरण केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली. या प्रकरणी येथील पोलीस स्थानकात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी प्रवीण प्रल्हाद पवार (40, मुंढे-टेपवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शहरातील खेंड येथील एका 15 वर्षीय बालिकेला 11 सप्टेंबर पहाटे 6च्या सुमारास अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले. या घटनेनंतर या बालिकेचा परिसरासह नातेवाईकांकडे शोध घेण्यात आला. मात्र ती सापडली नाही. अखेर या बाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानुसार या प्रकरणी अज्ञातांविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विनोद आंबेडकर करत आहेत