चिपळूण
लॉकडाऊनच्या काळातील जून ते सप्टेंबर महिन्याचा पगार न मिळाल्यामुळे व व्यवस्थापनाकडून सातत्याने चालढकल होत असल्याने या विरोधात एस.टी. चालक सूर्यकांत माने यांनी बुधवारपासून येथील आगारात उपोषणास बसले आहेत.
माने हे चिपळूण आगारात चालक पदावर काम करीत असून ते विविध आजाराने त्रस्त आहेत. लॉकडाऊन काळात जून, जुलै, ऑगस्ट व सप्टेंबरपर्यंतचा पगार त्यांना मिळालेला नाही. या बाबत त्यांनी स्थानिक आगार प्रशासनासह वरिष्ठ स्तरावर तक्रार करुनही त्याच्या प्रश्नाकडे कोणत्याही अधिकाऱयांनी दखल घेतली नाही. यापूर्वी देखील माने यांनी या प्रश्नी उपोषणास बसले होते. त्यावेळी प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानंतर त्यानी हे उपोषण मागे घेतले होते. असे असतानाही त्यांच्या पगाराचा प्रश्न मार्गी न लागल्याने अखेर त्यांनी पुन्हा एकदा या विरोधात उपोषण सुरु केले आहे.