8 पासून तीन दिवसांचा सरपंच निवडणूक कार्यक्रम जाहीर
प्रतिनिधी/ चिपळूण
तालुक्यात सार्वत्रिक निवडणूक झालेल्या ग्रामपंचायतीतील तब्बल 82 जण एकाचवेळी सरंपचपदी विराजमान होणार आहेत. यासाठी येथील निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांनी 8 फेबुवारीपासून तीन दिवस या ग्रामपंचायतीतील सरपंच निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.
यामध्ये 8 रोजी लोणारी व चिवेली बंदर, 9 रोजी खेर्डी, मिरजोळी, पिलवलीतर्फे सावर्डे, कापसाळ, कळंबट, तोंडली, पोसरे, रामपूर, गांग्रई, मालघर, दळवटणे, तुरंबव, मार्गताम्हाने खुर्द, बोरगांव, सावर्डे, निरबाडे, पिंपळी खुर्द, नायशी, कात्रोळी, ढोक्रवली, तनाळी आंबेरे बुद्रूक, मुंढे तर्फे चिपळूण, नागावे, कोंढे, पेढांबे, कोकरे, चिंचघरी, वेहेळे, कोळकेवाडी, दहिवली खुर्द, अडरे, कुटरे, कोसबी, तिवडी, अलोरे, फुरूस, खडपोली, खरवते, कुंभार्ली, खेरशेत, कुशिवडे, तिवरे, निवळी, कोंडमळा, कळंबस्ते, भोम, ओवळी व खोपड ग्रामपंचायतीत सरपंच निवड होणार आहे. 10 रोजी वीर, मुर्तवडे, वडेरू, कौंढरताम्हाने, पाचाड, मोरवणे, कळमुंडी, वाघिवरे, वालोटी, पिंपळी बुद्रूक, ताम्हणमळा, उभळे आगरगांव, तळसर, धामणवणे, कान्हे, दहिवली बुद्रूक, अनारी, तळवडे, मुंढे तर्फे सावर्डे, कादवड, दुर्गवाडी, आकले, कळवंडे, कोंडफणसवणे, आगवे, येगांव, रिक्टोली, पालवण, कुडप, वालोपे, रेहेळ वैजी, नांदिवसे व शिरळ या ग्रामपंचायतींमध्ये सरपंच निवड होणार आहे.