चिपळूण /
मुंबई-गोवा महामार्गावरील फरशी तिठा येथे विनापरवाना देशी-विदेशी दारुच्या विक्रीसाठी करुन ठेवलेल्या साठय़ावर पोलिसांनी शनिवारी धाड घडली. यात 37 हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नंदकुमार श्रीधर रेडीज (49, फरशी तिठा-चिपळूण) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेडीज याचे फरशी तिठा या ठिकाणी किराणा मालाचे दुकान असून त्या लगत एका बाजूला विक्रीसाठी देशी-विदेशी दारुचा साठा करुन ठेवला होता. या बाबतची माहिती पोलीस उपनिरीक्षक समद बेग यांना मिळाली. त्या आधारे पोलिसांनी या दारुसाठय़ावर धाड टाकून 37 हजार 134 रुपयाचा दारुसाठा जप्त केला आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जितेंद घाणेकर, पोलीस हेडकॉन्स्टेबल संतोष शिंदे, माहिला पोलीस आदिती जाधव, पोलीस कॉन्स्टेबल आशिष भालेकर, पंकज पडेलकर आदींच्या पथकाने केली.
गोवा बनावटीचा दारुसाठा जप्त
शहरतील ओझरवाडी येथे गोवा बनावटीचा दारु विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी धाड टाकून 1200 रुपये किंमतीची दारु जप्त केली. या प्रकरणी संतोष अरविंद रामाणे (ओझरवाडी-चिपळूण) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस हेडकॉन्स्टेबल उदय भोसले, आदिती जाधव, पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद कदम यांनी केली.