कोंढे येथील प्रकार, दोघांवर गुन्हा
चिपळूण
तालुक्यातील कोंढे येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने छापा टाकून तब्बल 1 लाख 76 हजार 640 रुपयांची गोवा बनावटीची दारु जप्त केली. ही घटना शुक्रवारी घडली. या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गजानन शंकर जमदाडे (वय 57, कोंढे-चंदनवाडी), प्रितेश प्रदीप देवळेकर (37, चिपळूण) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, केंढे येथे गोवा बनावटीच्या विदेशी दारुचा साठा करुन ठेवल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला मिळाली होती. त्यानुसार विभागीय उपायुक्त वाय. एम. पवार, अधीक्षक व्ही. व्ही. वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली या पथकाने कोंढे येथे शुक्रवारी रात्री 11 च्या सुमारास धाड टाकली.
यावेळी या पथकाने गोवा बनावटीच्या गोल्डन एस. व्हीस्कीचा 1 लाख 76 हजार 640 रुपये किंमतीचा साठा जप्त केला. या प्रकरणी जमदाडे व देवळेकर या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई उपनिरीक्षक किरण पाटील, सुनील सावंत, विशाल विचारे, सागर पवार आदींच्या पथकाने केली.