चिपळूण
शौचालयाचा दरवाजा बंद करताना वृध्देच्या गळ्यातील 40 हजार रूपये किंमतीची सोन्याची माळ चोरल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली. याप्रकरणी एका तरुणाविरोधात पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची फिर्याद सरस्वती विष्णू सावंत (90, गुढे-केंढवी) यांनी दिली आहे. विलास आत्माराम मोहिते (40, गुढे-कोंढवी) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. सरस्वती या 18 रोजी पहाटे 5.30 वाजण्याच्या सुमारास शौचालयाचा दरवाजा बंद करत असताना विलास याने त्यांच्या गळय़ातील 40 हजार किंमतीची सोन्याची माळ चोरुन नेली. या प्रकरणी रविवारी मोहिते याच्याविरोधात चिपळूण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस फौजदार जाधव करीत आहेत.