चिपळूण
भिशीचे पैसे कधी देणार, अशी विचारणा केल्याने एका व्यापाऱयाने एकास जातीवाचक शिवीगाळ केल्याची घटना शुक्रवारी दुपारी 1.30 च्या सुमारास शहर बाजारपेठेतील एका दुकानात घडली. या प्रकरणी व्यापाऱयाविरोधात ऍट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लियाकत सलिम मेमन (अब्बास पार्क-गोवळकोट) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. या बाबतची फिर्याद अमित जनार्दन चिपळूणकर (34, परांजपे स्किम-रावतळे) यांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 ऑक्टोबर रोजी दुपारी 1.30 च्या सुमारास चिपळूणकर यांच्यासह त्यांची पत्नी सोनाली चिपळूणकर व तबरेज मुजावर हे तिघेजण लियाकत मेमन याच्या शहरातील बाजारपेठतील सना कलेक्शन या दुकानात गेले होते. त्यावेळी त्यांनी मेमन याच्याकडे भिशीचे 4 लाख रुपये कधी देणार, अशी विचारणा केली असता मेमन याने चिपळूणकर यांना जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच चिपळूणकर यांच्या पत्नीला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करुन धक्का दिला. या घटनेनंतर चिपळूणकर यांनी पोलीस स्थानकात तक्रार दिली असून त्यानुसार मेमन याच्यावर शुक्रवारी रात्री उशिरा ऍट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे करीत आहेत. ते या घटनेनंतर शनिवारी चिपळुणात आले होते.