नगर परिषद दवाखाना, तहसील, आरोग्य विभागासह पंचायत समितीतही शिरकाव
प्रतिनिधी/ चिपळूण
नगर परिषद दवाखाना, आरोग्य विभाग, तहसीलसह आता पंचायत समिती कार्यालयातही कोरोनाने शिरकाव केला आहे. शासकीय कार्यालयांचा हा विळखा धोक्याचा असून त्यावर नियंत्रण मिळवणे गरजेचे आहे. रविवारी रात्री आलेल्या अहवालानुसार 22 नव्या रूग्णांची भर पडल्याने तालुक्याचा आकडा 503वर गेला आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहरासह तालुक्यात कोरोनाचे रूग्ण वाढत चालले आहेत. रविवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालानुसार 22 नव्या रूग्णांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यात पंचायत समितीच्या एका कर्मचारी महिलेचा समावेश आहे. या 22 रूग्णांमुळे तालुक्याचा बाधितांचा आकडा 503वर गेला आहे. सुरूवातीला येथे नगर परिषदेच्या दवाखान्यातील काही कर्मचाऱयांना याची लागण झाली. त्यानंतर पंचायत समितीच्या आरोग्य विभागातील कर्मचारी बाधित झाले. दोन दिवसांपूर्वी तहसील कार्यालयातील एका कर्मचाऱयाला कोरोना झाल्याचे पुढे आले असतानाच आता पंचायत समिती कार्यालयातील महिला कर्मचाऱयाला लागण झाल्याने कोरोनाने शासकीय कार्यालयातच शिरकाव केल्याचे दिसून येत आहे.
कोरोनाच्या परिस्थितीत जनतेला सुरक्षित ठेवण्यासाठी झटणाऱया योध्दय़ांच्या कार्यालयातच कोरोना शिरत असल्याने भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे या कार्यालयांमधून या रोगाला हद्दपार करण्यासाठी प्रशासनाला विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत. दोन दिवसांपूर्वी वरिष्ठ अधिकाऱयाच्या चालकाला कोरोना झाला असल्याने वरिष्ठ अधिकाऱयासह अनेक अधिकारी व कर्मचारी घाबरले आहेत. त्यामुळे त्यांचे नमुने घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यांच्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.