मंदिरातील चोरी प्रकरणात सहभाग असल्याचा संशय
चिपळूण
तालुक्यातील मंदिरांसह अन्य ठिकाणी झालेल्या चोऱया प्रकरणी मुख्य सूत्रधारास पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याच्या चौकशीतून दोघांची नावे पुढे आली असून त्यांना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस चौकशीत त्यांचाही या चोऱयांमध्ये सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
लागोपाठ मार्गताम्हाने, तुरंबव, मिरवणे या तीन ठिकाणच्या मंदिरात चोऱया झाल्यानंतर या प्रकरणी मुख्य सूत्रधार असलेल्या विराज भडवळकर याला पोलिसांनी अटक केली होती. त्याची या चोरीप्रकरणी चौकशी सुरु असतानाच त्याने 8 चोऱयांची कबुली दिली होती. यामध्ये घरफोडीसह पॅमेरा शोरुम फोडल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. त्याची चौकशी सुरु असतानाच त्याने आणखी दोघांची नावे सांगितली होती. या चोऱयांमध्ये त्यांचाही सहभाग असल्याचे सांगितले होते. ही दोन नावे पुढे येताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत त्यांची चौकशी सुरु केली आहे. या दोघांच्या चौकशीतून आणखी काही महत्वाच्या चोऱया उघड होण्याची शक्यता वर्तवली असून पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरु केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मन्सून मणेर करीत आहेत.